Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम दरवाजाचा कोयंडा तोडून लाखोंचे दागिने लंपास

दरवाजाचा कोयंडा तोडून लाखोंचे दागिने लंपास

Related Story

- Advertisement -

 घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा कोयंडा तोडून ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना मराठा कॉलनी, चेहडी पंपिंग स्टेशन येथे घडली. याप्रकरणी उत्तम सारुक्ते यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरात कोणी नसल्याची खात्री करत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याची पोत, सोन्याची चेन, बोरमाळ, नेकलेस, नथ, वेल, दोन अंगठ्या व ५० हजार रुपयांचा समावेश आहे. सहायक पोलीस निरीक्षक एम. डी. परदेशी करत आहेत.

गणेशवाडीत सराईत गुन्हेगार ताब्यात

गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करणार्‍या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना गणेशवाडीत घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई अविनाश थेटे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खंडवा (वय ३१, मूळ रा.पंचवटी, सध्या रा.त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, नीलेश सोनवणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर पंचवटी, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो गणेशवाडीतील भाजी मार्केटजवळ संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस नाईक आर. यु. शिंदे करत आहेत.

दार उघडे ठेवून झोपणे पडले महागात

- Advertisement -

अंबडमधील गडाख कुटुंबियांना दार उघडे ठेवून झोपणे चांगलेच महागात पडले. चोरट्याने उघड्या दारातून आत प्रवेश करत लॅपटॉप व तीन लंपास केल्याची घटना अशोका कल्पतरु रो-हाऊस, सातपूर-लिंक रोड येथे घडली. याप्रकरणी सतीश गडाख यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गडाख कुटुंबिय घरात झोपले होते. झोपण्यापूर्वी नजर चुकीने दरवाजा उघडाच राहिला. ही संधी साधत चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लॅपटॉप, तीन मोबाईल लंपास केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

वाहनाच्या धडकेत एक ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना एबीबी कंपनीसमोर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी राजेश मुदगल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी छोटा हत्ती वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनेश माणिक धोरण (वय ३५, रा. शिवाजीनगर, सातपूर) मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी एबीबी कंपनीसमोर भरधाव छोटा हत्ती (एमएच १२-क्यूजी ०५८१)ने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दिनेश धोरण यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर छोटा हत्तीचालक वाहनासह पळून गेला. त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सैय्यद करत आहेत.

- Advertisement -