घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजळीतप्रकरण : अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू

जळीतप्रकरण : अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू

Subscribe

प्रेमप्रकरणाच्या वादातून रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून पेटवलेल्या घरातील ५८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि.१५) मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक सुखदेव गुलाब कुमावतविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबाद रोडवरील शिंदेनगर परिसरातील भाविक सोसायटीतील एका सदनिकाला आग लावण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १०) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला होता. रिक्षाचालक सुखदेव गुलाब कुमावत या रिक्षाचालकाने ही आग लावली होती. त्यात दोन महिला गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यातील भारती आनंद गौड (वय ५८) या महिलेचा मृत्यू झाला. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून जाळपोळीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेचा मृत्यू झाल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

भाविक सोसायटीतील गौड यांच्या सदनिकेत मंगळवारी त्यांच्या मावशी भारती गौड आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास रिक्षाचालक सुखदेव कुमावत दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने भारती गौड यांना मारहाण केली व पेट्रोल टाकून आग लावून तो फरार झाला होता. त्यावेळी घरात वयोवृद्ध दाम्पत्य, भारती गौड व दोन मुले होते. भांडणाचा आवाज व आग बघून एका मुलाने बेडरुमचा दरवाजा बंद केला होता. त्याने कॉल करुन आईवडिलांना घटनेची माहिती दिली. आगीत दोन महिला जखमी झाल्या होत्या. फ्लॅटमध्ये आग लागल्याने आतमधील सर्वजण भेदरलेले होते. सर्वजण जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होते. आगीचे लोळ बाहेर येत असल्याने सोसायटीखाली शेकडोहून नागरिक उपस्थित होते.. पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागायला नको म्हणून कोणीही मदतीला पुढे येत नव्हते. आग लागल्याचे समजताच माणुसकीच्या भावनेतून फ्लॅटमध्ये अडकलेल्यांचे जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले आणि मनसेचे महानगर सरचिटणीस प्रवीण काकड यांनी मदतकार्य केले. त्यामुळे दोन मुले आणि वयोवृद्ध दांपत्य असे चौघांचे जीव वाचवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -