घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रव्यावसायिकाच्या हत्येचे गूढ कायम; खूनाचा गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग

व्यावसायिकाच्या हत्येचे गूढ कायम; खूनाचा गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग

Subscribe

नाशिकरोड : सोनवणे हत्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, हत्येबाबत गुढ कायम असून कारखान्यातील कामगार व नातेवाईक यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे, शहर व ग्रामीण पोलिसांकडून कामगारांसह इतरांचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान, मुलगा अमेरिकेवरुन आल्यानंतर मृत सोनवणे यांच्यावर अमरधाम मध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिकरोड येथील व्यावसायिकाचे चार दिवसांपुर्वी कार मधून अपहरण करुन मालेगाव तालुक्यात हत्या करण्यात आल्याने संपुर्ण शहर हादरले आहे, या घटनेने शहर व ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावर पथके स्थापन करत तपास सुरु केला आहे. रविवारी (दि.११) रात्री मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलीस अधिक्षक सचीन पाटील यांनी सदर गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान कारखान्यातील कामगारांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

सोमवारी (दि.१२) पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा २ चे निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल, अधिका-यांनी मयत सोनवणे यांच्या घरी भेट दिली. शहर व ग्रामीण पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांकडून एकाच वेळी तपास सुरु करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -