घरमहाराष्ट्रनाशिक‘मे’ अखेरपर्यंत नाशकातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मनपा प्रशासनाचे आश्वासन, 'एमएनजीएल'चे काम ४...

‘मे’ अखेरपर्यंत नाशकातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मनपा प्रशासनाचे आश्वासन, ‘एमएनजीएल’चे काम ४ महीने बंद

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने शहरात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले असून एमजीएनएलचे रस्ते खोदाईचे काम १० मे पासून पुढील चार महिन्यांसाठी थांबविण्यात आले आहे. या रस्ता दुरूस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले असून मे अखेरपर्यंत शहर खड्डेमुक्त होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शिवाय या कामामुळे महावितरणच्या वीज वाहिन्या, पाणी पुरवठ्याच्या लाईन्स, ड्रेनेज लाईन फुटण्याच्या घटनाही घडल्या. या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. एमजीएनएलच्या कामाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने १० मे पासून रस्ता खोदाईचे काम पुढील चार महिने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरीत काम आता पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये करता येणार आहे. दरम्यान, शहरात जी कामे झाली आहेत त्या रस्त्यांवरील ट्रेन्च दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने वेगाने हाती घेतले आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मे महिन्याच्या अखेरीपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे उद्दिष्ट आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अधिपत्याखाली आणि सर्व कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या पश्चिम विभागात बांधकाम विभागाकडून महात्मानगर परिसर, पारिजात नगर, श्रीरंग नगर, सप्तश्रृंगी कॉलनी, प्रमोद नगर, निर्मल कॉलनी, विद्याविकास सर्कल ते विसेे चौक रस्ता, सहदेव नगर येथे दुरुस्तीचे काम सुरु आहे.
नाशिकरोड भागात स्वा. वि. दा. सावरकर उड्डाणपुल येथे दुरुस्ती झाली आहे. पूर्व विभागात प्रभाग क्र. ३० परब नगर, विजय ममता चौक ते ड्रीम सिटी चौक दरम्यान प्रभाग क्र. १६ तसेच सात्विक नगर प्रभाग क्र. २३ येथे दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्र. २४ मधील तिडके नगर परिसरातील एमएनजीएलने खोदलेल्या ट्रेनचेसची दुरुस्ती प्रगतीत आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागात एम. जी. रोडवर जिओ फायबर ट्रेंच दुरुस्तीचे कामही प्रगतीपथावर असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -