घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिका मुख्यालयात कॅन्टीन; जेवणाच्या नावाने घरी पळणाऱ्यांना बसणार चाप

महापालिका मुख्यालयात कॅन्टीन; जेवणाच्या नावाने घरी पळणाऱ्यांना बसणार चाप

Subscribe

नाशिक: कार्यालयीन काम सोडून बाहेर गप्पा झोडणार्‍या कर्मचार्‍यांना लगाम घालण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. अनेक कर्मचारी दुपारच्या जेवणाच्या नावाने बराच काळ ‘गायब’ राहत असल्याने निविदा प्रसिद्ध करुन मुख्यालयातच कॅन्टीन सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

महापालिकेचे कर्मचारी कामाच्या वेळेत चहा-पाणी करताना दिसतात. अशा टाईमपास करणार्‍या कर्मचार्‍यांमुळे अनेक कामे प्रलंबित राहत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे. साप्ताहिक सुटीचे दोन दिवस केल्यानंतर दररोजच्या कामाच्या वेळेत वाढ करुन देण्यात आली आहे. या वेळेत कर्मचार्‍यांनी काम करणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात काही मंडळी चकाट्या मारत फिरताना दिसतात. त्यामुळे अभ्यांगतांनाही कर्मचारी भेटत नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिल्यात.

- Advertisement -

लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

नाशिक महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनातील कॅन्टीन ठेकेदारांमधील वादामुळे अनेक वर्षांपासून बंद आहे. नगरसेवकांच्याच निकटवर्तीयांना कॅन्टीनचा ठेका देण्याची अनिष्ठ प्रथा त्याकाळी महापालिकेत रुढ झाली होती. त्यावरुन वाद होऊन कॅन्टीनच बंद करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी घेतला. त्यानंतर आता ही कॅन्टीन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आयुक्त रमेश पवार यांनी घेतला आहे. कर्मचारी जेवणासाठी घरी जातात आणि यावेळेत महापालिकेचे कामकाज रखडते ही बाब लक्षात आल्याने कॅन्टीन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -