Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक भरधाव कार उलटली, सुदैवाने चालक बचावला

भरधाव कार उलटली, सुदैवाने चालक बचावला

राणेनगर येथून सातपूरच्या दिशेने जाताना पेलिकन पार्कजवळ झाला अपघात

Related Story

- Advertisement -

राणेनगर येथुन कामानिमित्त सातपूर येथे निघालेली वॅगन-आर आणि इटिऑस कार यांच्यात पेलिकन पार्कच्या रस्त्यावर अपघात झाला. या घटनेत वॅगन-आर दोन ते तीन वेळा उलटली. सुदैवाने चालक बचावला.

चेतनानगर येथील रहिवासी प्रणव रघुनाथ दास (वय ५६ ) हे वॅगन-आर कारने (एमएच-१५, व्हीबी-३०७३) कामानिमित्त सातपूरकडे निघाले होते. राणेनगरकडून जात असताना पेलिकन पार्कजवळ समोरून येणाऱ्या इटीयॉसने (एमएच-१५, डीएम-५१७९) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, वॅगन-आर कार पलटली. यात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जिवीतहानी टळली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -