घरताज्या घडामोडीनाशिक : मद्यधुंद पोलिसांचा राडा; पोलिसांवर गुन्हा दाखल

नाशिक : मद्यधुंद पोलिसांचा राडा; पोलिसांवर गुन्हा दाखल

Subscribe

मद्यधुंद पोलिसांनी मध्यरात्री दारुच्या नशेत राडा घालत. विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास मद्यधुंद पोलिसांचा कारनामा समोर आला आहे. मद्यधुंद पोलिसांनी मध्यरात्री दारुच्या नशेत राडा घालत. स्वत:ची चूक असताना देखील विनाकारण दुसऱ्याची गाडी असलेल्या चालकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

नाशिकमधील लेखानगर भागात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पोलिसांनी वाहनांना धडक दिली. भरस्त्यात ज्यांची वाहने ठोकली त्यांनाच या पोलिसांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्याविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाशिकमध्ये ४ मे रोजी वाईन शॉप सुरु करण्यात आले होते. त्यमुळे वाईन शॉप-दारु दुकानांबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा वाढत असल्याने एकच गर्दी झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने सुरु करण्यास सांगितल्याने, प्रशासनात समन्वय आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात पाच नवे रुग्ण

दरम्यान, मंगळवारी प्राप्त अहवालात नाशिकसह सटाणा, सिन्नर ृ, येवला आणि मालेगाव येथील प्रत्येकी एक असे पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिका क्षेत्रातील एकूण प्राप्त अहवालात ८० पैकी पाच अहवाल सकारात्मक, तर ७५ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मालेगावमध्ये १४ अहवाल प्राप्त झाले. त्यात १३ नकारात्मक, तर नयापुरा भागातील ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ३८३ वर पोहचली आहे. यामध्ये मालेगावमध्ये ३३२, तर नाशिक शहरात १८ आणि ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश आहे. मालेगावच्या तुलनेत नाशिकमध्ये फारशी चिंताजनक स्थिती नसल्याचे चित्र आता बदलू लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -