घरताज्या घडामोडीलासलगावमध्ये आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण; दुकानात काम करणाऱ्याला करोनाची लागण

लासलगावमध्ये आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण; दुकानात काम करणाऱ्याला करोनाची लागण

Subscribe

लासलगाव येथील 30 वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात स्वतः आलेल्या या युवकाचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे तो परदेशवारी किंवा पुणे, मुबंईतून आलेला नाही तर तो दुकानातील कामगार आहे.

जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील 30 वर्षीय युवकाला गुरुवारी सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तो खासगी क्लिनिककडे गेला होता. तर दुसऱ्या दिवशी तो लासलगाव आरोगय केंद्रात गेला असता, तेथून  त्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले . शुक्रवारी त्याचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रविवारी रात्री प्राप्त झाले असता त्यात तो पॉझिटिव्ह निघाला आहे. त्या युवकाच्या संपर्कात असणाऱ्या त्याच्याच कुटुंबातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. त्या रुग्णाची तब्येत स्थिर असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत. करोना विलगीकरण कक्षातील इतर सातजणांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना सोमवारी डिस्चार्ज दिला जाणार आहे.

- Advertisement -

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणानुसार करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक आदी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून जावू नये, घराबाहेर जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -