घरताज्या घडामोडीकोरोनाबाधित शिकाऊ डॉक्टर : सुरगाण्यातील 31 जण क्वारंटाईन

कोरोनाबाधित शिकाऊ डॉक्टर : सुरगाण्यातील 31 जण क्वारंटाईन

Subscribe

सुरगाणा तालुक्यातील तळपाडा (हातरूंडी) येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर नाशिक शहरात तात्पुरते राहण्यास असले तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या संपर्कातील 31 जणांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर 9 एप्रिल रोजी मुळगावी तळपाडा (हातरूंडी) येथे आले होते. दुसऱ्या दिवशी ते नाशिकला रवाना झाले होते. दरम्यान कुटूंबासह 31 जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्या 31 जणांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये आई, वडील, दोन महिन्याचे बाळ, एक डॉक्टर, त्यांचे कुटुंब व चालक यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणं नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या आणखी कोण आले आहे का, त्याचा शोध गटविकास अधिकारी रत्नाकर पगार घेत आहेत. तसेच तहसिलदार विजय सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर,पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे आदी लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी मुख्यालयी न थांबता दररोज एकाच वाहनातून ये जा करीत आहेत. याबाबत तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्ण हा तालुक्यातील रहिवासी असला तरी तो नाशिकमध्येच रहात आहे. तळपाडा(ह) येथे वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून 31 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावातील कोणालाही ताप, सर्दी,खोकला,दम लागणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. शासनाकडून आलेल्या सुचनांचे पालन करावे. माॅस्क लावणे, हात धुणे,सॅनेटाईजचा वापर करावा. वैद्यकीय पथक सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
डाॅ. दिलीप रणवीर,  तालुका वैद्यकीय अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -