घरमहाराष्ट्रनाशिकमराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेणार

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेणार

Subscribe

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : सकल मराठा समाजातर्फे भाजप नेत्यांचा सत्कार

मराठा समाजाला शिक्षणात 12, तर नोकरीत 13 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर सकल मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला. आरक्षण लढ्यात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची मंगळवारी (दि.2) सांगता झाली. शेवटच्या दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांसह महत्वाचे मंत्री सभागृहात उपस्थित होते. यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भेट देऊन पेढे भरवण्यात आले. शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चांची इतिहासात नोंद झाली आहे. त्याची नोंद घेऊन सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सीमा हिरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, नगरसेवक उद्धव निमसे, डॉ. अमोल वाजे, संपत चव्हाण, विजय खर्जुल, गोटीराम करंडे, गोरख चव्हाण, नवनाथ शिंदे, किरण डोखे, भारत पिंगळे, सतीश नवले, आदित्य पाटील, सचिन पवार, निलेश मोरे, विलास जाधव, सुधील घडवजे, विक्रम शेजवळ, दिनेश जाधव, पूजा धुमाळ, शकुंतला कापडणीस, अरुणा डुकरे, प्रवीण घोडे, मयूर लवटे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

सकल मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना पदाधिकारी. समवेत पालकमंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, करण गायकर, नगरसेवक उद्धव निमसे आदी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -