घरताज्या घडामोडीसीबीएस सिग्नल ते राणे डेअरी रस्ता नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन

सीबीएस सिग्नल ते राणे डेअरी रस्ता नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन

Subscribe

शरणपूर रोडवरील सीबीएस बसस्थानक ते राणे डेअरी (राका कॉलनी कॉर्नर) दरम्यान शुक्रवार (दि.६) पासून नो पार्किंग व नो हॉल्टिंग झोन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सीबीएस बसस्थानक ते राणे डेअरी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी पार्क करता येणार नाही. विशेष म्हणजे, अधिसूचनेचे उल्लंघन करणार्‍यांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार आहे.

शरणपूर रोडवरील सीबीएस बसस्थानक ते राजीव गांधी भवन परिसरामध्ये वाहनांची वाहतूक कोंडी होते. या रोडवर मेळा बसस्थानक, उत्पादन शुल्क विभाग, महापालिका मुख्यालय आणि खासगी आस्थापनांची कार्यालये असल्याने वाहनचालक दुचाकी व चारचाकी वाहने शरणपूर रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होवून छोटे-मोठे अपघातही नित्याचेच होत आहे. त्यामुळेे वाहतूक विभागातर्फे सीबीएस ते राणे डेअरी शरणपूर रोड (राका कॉलनी कॉर्नर) नो पार्कींग व नो होल्डींग झोन जारी करण्यात आला आहे. हॉल्टिंग झोनमुळे वाहनचालकांना कारवाई टाळण्यासाठी गाडीत बसून थांबतासुद्धा येणार नाही. पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रीगी आदी शुक्रवारी (दि ११) सदर आदिसुचना जारी केली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकावर मोटर वाहन अधिनियम नुसार कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय, पोलीस, रुगणवाहिका, शववाहिका, अग्निशमन विभागाच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

अधिसूचना दुसर्‍यांदा काढण्याची नामुष्की

नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील सीबीएस सिग्नल ते राणे डेअरीदरम्यान वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे २००९ मध्ये नो पार्किंगबाबत अधिसूचना करण्यात आली होती. मात्र, याकडे वाहनचालकांसह वाहतूक शाखेने दुर्लक्ष केले. दररोज वाहतूक कोंडीसह अपघात होवू लागल्याने वाहतूक शाखेने आता नव्याने नो पार्किंग व नो हॉल्टिंगबाबत अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आता नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करुन आतमध्ये बसणे वाहनचालकांना टाळावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -