घरताज्या घडामोडीदोन दिवस सीबीएस ते मेहेर चौक राहणार बंद

दोन दिवस सीबीएस ते मेहेर चौक राहणार बंद

Subscribe

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल व नाशिक बार असोसिएशनतर्फे शनिवारी (दि.१५) व रविवारी (दि.१६) नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते वकील परिषदेचे व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या कामाचे उदघाटन केले जाणार आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री छगन भुजवळ आदी उपस्थितीत राहणार आहेत. परिषदेच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सीबीएस ते मेहेर चौकापर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतूक शनिवारी व रविवारी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

सीबीएस ते मेहेर चौक शनिवारी (दि.१५) दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत आणि रविवारी (दि.१६) सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. वाहतूक बदल अधिसूचना पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी गुरुवारी (दि.१३) प्रसिद्ध केली आहे. वाहन प्रवेश बंद अधिसूचनेचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवेश बंद निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व इतर शासकीय वाहनांना लागू राहणार नाही.

- Advertisement -

पर्यायी मार्ग
सीबीएस चौकाकडून डाव्या बाजूकडे वळून टिळकवाडी सिग्नल मार्गे इतरत्र जावे. मेहेर चौकातून डाव्या बाजूकडे वळून एमजी रोडमार्गे सांगली बँक सिग्नलमार्गे इतरत्र जवे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -