टी वाय च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेरले

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

pune uni chancellor
टी वाय च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेरले

वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि.४) पुणे विद्यापीठ येथे कुलगुरू नितीन कळमळकर यांना घेराव घातला. एम.लॉ .या एकाच विषयात हजारो विद्यार्थी नापास झाल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. अनपेक्षित निकाल लागल्यानंतर गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनसाठी पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील विभागीय कार्यालयात वेळोवेळी पत्रव्यवहार सुरु केला;मात्र विद्यापीठ प्रशासनाने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

विभागीय कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आज नाशिक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे विद्यापीठामध्ये जाऊन या प्रकरणासंबंधी कुलगुरू नितीन कळमळकर यांना त्यांच्याच दालनात घेराव घालण्यात आला.प्रारंभी विद्यार्थ्यांची संपूर्ण बाजू ऐकून घेत आजच रिव्हॅल्युएशनचा निकाल लागेल असे उत्तर दिले पण विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे निकाल जसा आहे तसाच समोर आला. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना हा तोच निकाल असल्याचे सांगताच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना याप्रकरणी एक पाच सदस्यांची समिती स्थापन करून सोमवार पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कुलगुरूंसोबत चर्चा करत असतानाच काही विद्यार्थ्यांना रडू कोसळले, इतर विषयात खूप चांगले गुण आणि एम.लॉ मध्ये नापास त्यामुळे पालकांनी देखील अविश्वास दाखविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील,नाशिक शहर जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे,संकेत ढवळे,श्रेयांश सराफ,आकाश झोंबरे, भावनेश राऊत मयूर दिवटे अक्षय दाते यांच्यासह विध्यार्थी प्रतिनिधी कमलेश काळे,तन्वी पूर्णपत्रे,ऋषिकेश मेथे यांच्यासह ५० ते ६० विद्यार्थी उपस्थित होते.