नाशिक : शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून, गुन्हेगारीचा ट्रेण्ड बदलला असल्याचे पोलिसांनी केलेल्या मानसशास्त्रीय अभ्यासातून समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून मोक्का, एमपीडीएसह टवाळखोरांवर कारवायांसह वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाकाळात रस्त्यांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते. कोरोनानंतर रस्त्यांवरील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. शिवाय, अल्पवयीन मुलांचा वापर गुन्हेगार करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना ‘टार्गेट’ केले आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वॉच ठेवला जात असून, अनेक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमधील गुन्ह्यांचा व त्या गुन्ह्यातील मोडस ऑपरेडींचा अभ्यास करून कारवाया केल्या जात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन अवैध धंदे रोखण्यासाठी अंमलीपदार्थ विरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, दरोडा व शस्त्रविरोधी पथक तयार करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. शांतता समितीमध्ये तरुण, राजकारण, सामाजिक, ऐतिहासिक व मानसशास्त्रीय ज्ञान असणार्या शिक्षक व प्राध्यापकांचा सहभाग करून घेतला आहे.
पोलिसांनी केलेल्या उपाययोजना
- सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी १०१४ सायबदूत नागरिकांना सायबर साक्षर करत आहेत.
- बेशिस्त वाहनचाकांवर ई-चलन प्रणालीमार्फत कारवाय केली जात आहे.
- पोलिसांसाठी नियमित पोलीस प्रशिक्षण हॉलेमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
- पोलीस ठाण्याचे कामकाज सुधारण्यासाठी दरमहा गुन्हे आढावा बैठक घेतला जात असून, अनुक्रमे क्रमांक दिले जात आहे.
- अपहरणप्रकरणातील १७४ मुलेमुली व बेपत्तामधील ७३६ जणांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने घेतला आहे.
नाशिक शहरात कोरोनाकाळात गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. कोरोनाकाळात निर्बंध असल्याने स्ट्रीट क्राईम कमी होते. कोरोनानंतर स्ट्रीट क्राईममध्ये वाढ झाली आहे. तीन वर्षातील तोडफोडीचा अभ्यास पोलिसांनी केला आहे. गुन्हेगारांची मानसिकता बदलली असून, ते रिकामे राहू नयेत, यासाठी एमपीडीएअंतर्गत कारवाया व मोक्का कारवाया केल्या जात आहेत. : किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १