घरमहाराष्ट्रनाशिकआव्हानांच्या ट्रॅकवर बाईकर्सचा थरार

आव्हानांच्या ट्रॅकवर बाईकर्सचा थरार

Subscribe

एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीचा थरार रंगला

रिमझिम पाऊसधारा, चिखलामुळे निसरडे रस्ते, खड्ड्यांतून शोधावी लागणारी वाट आणि वळणवळणांचा रस्ता अशी एक ना अनेक आव्हाने पार करत घोटी-वैतरणा परिसरात रविवारी (ता. १४) सकाळी 7 वाजेपासून एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीचा थरार रंगला. पहिल्या दोन्ही फेर्‍या जिंकणार्‍या राजेंद्र आर. ई. याने गतवेळचा विजेता नटराजला तब्बल दीड मिनिटांच्या फरकाने मागे सोडत विजेतेपद पटकावले.

खडतर आणि चिखलाचे साम्राज्य असलेल्या आव्हानात्मक ट्रॅकवर बाईक रायडर्सने आपले कौशल्य पणाला लावत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडली. ए. डब्ल्यू. इव्हेन्ट्सच्या वतीने मोटरक्रीडाप्रेमींसाठी आयोजित या स्पर्धेत विविध गटांत राज्यभरातील 46 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गोदाश्रद्धा फाऊंडेशन, द ग्रीन हेरिटेज रिसॉर्ट, सोल मेन्स वेअर यांचे या स्पर्धेकरता सहकार्य लाभले. विदेशी बनावटीच्या तेजतर्रार गाड्यांबरोबरच भारतीय बनावटीच्या मोटरसायकल, बुलेट, स्कुटर आदी चालकांचे सर्वोत्तम कसब पाहण्यासाठी नाशिककरांसह परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. १३ किलोमीटरची एक अशा चार फेर्‍या होत्या. ५२किलोमीटर स्पर्धात्मक मार्ग तर ४६किलोमीटर वाहतूक मार्ग होता. एकूण अंतर ९८.४४ किलोमीटर इतके होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -