घरताज्या घडामोडीनाशिक : लासलगाव पीडितेची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

नाशिक : लासलगाव पीडितेची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Subscribe

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तसेच पीडितेवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

लासलगाव येथे शनिवारी दोघांनी पीडितेवर पेट्रोल टाकून पेटवले. त्यात गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितीची चौकशी केली. त्याचप्रमाणे हा हल्ला दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बाटलीमध्ये पेट्रोल देणाऱ्या पंप चालनकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या आधीच्या घटनांमध्ये आरोपींनी ज्या पंपावरून पेट्रोल घेतले त्या पंप चालकांवर देखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

नेमके काय घडले?

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर पीडित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी अशी दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्यानं घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -