अंबड-लिंक रोड परिसरातील संजीव नगर भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका दीड वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आणि महापालिकेची बघ्याची भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अंबड लिंक रोड परिसरातील संजीव नगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यास जखमी केले. यानंतर परिसरात नागरिकांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे परिसरात संपूर्ण घबराट पसरली असून तत्काळ परिसरातील भटक्या कुत्र्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी केली आहे.