घरमहाराष्ट्रनाशिकअबब! कोथिंबीरीची जुडी 331 रुपयांना

अबब! कोथिंबीरीची जुडी 331 रुपयांना

Subscribe

मार्केट यार्डात फक्त 25 टक्के आवक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (दि.16) कोथिंबीर 33 हजार 100 रुपये शेकडा दराने लिलावात विक्री झाली. पालेभाज्यांच्या आगोदरच आवक कमी असल्याने आणि आज फक्त 25 टक्केच आवक झाल्याने कोथिंबिरीला आजपर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला. त्यामुळे पाले भाज्यांमध्ये कोथिंबिर सर्वाधिक चर्चेत होती.

कळवण तालुक्यातील कनासी येथील शेतकरी काशिनाथ कामडी यांनी अडीचशे जुड्या मार्केटमध्ये लिलावासाठी आणल्या होत्या. मोठी जुडी, हिरवेगार टवटवी आणि कोरडी असलेली कोथिंबिर उच्च दर्जाची असल्याने तिची खरेदी गुजरातचे व्यापारी शाम बोडके यांनी 33 हजार 100 रुपये शेकडा दराने लिलावात खरेदी केली. कोथिंबिरीचे इतर पालेभाज्याच्या तुनलेत आवक अधिक होती. मात्र, मागणीच्या तुनलेत ती कमीच असल्याने दर अधिक आहे. एरवीही कोथिंबिर सरासरी 70 ते 150 रुपये प्रतिजुडी दराने मार्केटमध्ये घाऊक स्वरुपात विक्री होत आहे, असे आडते राजू आंधळे यांनी माहिती देताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -