घरमहाराष्ट्रनाशिकसंततधारेचा दिलासा, १५ मिमी नोंद

संततधारेचा दिलासा, १५ मिमी नोंद

Subscribe

काही भागांत अतिवृष्टीचा इशारा, धरणसाठ्यातही वाढ

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत परतलेल्या पावसाने गुरुवारी, २५ जुलैला दुसर्‍या दिवशीही संततधार कायम ठेवत दिलासा दिला. दिवसभरात शहरामध्ये १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

आठवडाभराच्या अंतराने परतलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांपासून कायम आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचीही चांगलीच धावपळ झाली. गुरुवारी दिवसभरात गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात ९३ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, शहरासह ग्रामीण भागांतही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -