३० हजारांची लाच घेताना नगर परिरक्षक भूमापक अधिकारी अटक

खरेदी केलेल्या घराला वडिलांचे नावे लावण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.३१) नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील नगर परिरक्षक भूमापक अधिकार्‍यास अटक केली. संदिप हरीलाल चव्हाण असे लाच घेतलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.

संदीप चव्हाण यांची नेमणूक परीक्षण भूमापक म्हणून नगर भूमापन अधिकारी कार्यालय क्रमांक एक येथे आहे. तक्रारदारांच्या वडिलांचे नावे खरेदी केलेल्या घराला वडिलांचे नाव लावण्यासाठी संदीप चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. गुरुवारी (दि.३१) नगर भूमापन अधिकारी कार्यालयात ५० हजारांपैकी तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी ३० हजार रुपये तक्रारदाराकडूना स्वीकारताना चव्हाण यास पथकाने अटक केली.