घरमहाराष्ट्रनाशिकसंदर्भ सेवा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित 

संदर्भ सेवा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित 

Subscribe

संदर्भ सेवा रुग्णालय येथे नव्याने बसविण्यात आलेल्या सिटी स्कँन मशीनचे लोकार्पण शनिवारी ९ मार्चला आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किडनी प्रत्यारोपण विभागाचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

संदर्भ सेवा रुग्णालय येथे नव्याने बसविण्यात आलेल्या सिटी स्कँन मशीनचे लोकार्पण शनिवारी, ९ मार्चला आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किडनी प्रत्यारोपण विभागाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले.

संंदर्भ सेवा रुग्णालय येथे नव्याने बसविण्यात आलेल्या सिटी स्कँन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. ५.२० कोटी रुपयांच्या ह्या यंत्रामुळे कार्डीयाकचे निदान तसेच पोटाचे व आतड्याचे निदान सोपे होणार आहे. १६० स्लाईस असणारे हे नाशिक शहरातील पहिले मशीन आहे. याप्रकारच्या सुविधा गरीब जनतेसाठी उपलब्ध झाल्यामुळे सिटी स्कँन सुविधेसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचप्रमाणष या रुग्णालय परिसरात किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे भूमिपूजन करण्यात आले. याविभागासाठी २ कोटी रुपयांचा निधी खर्च होणशर आहे. यात दोन मॅाडीलर ऑपरेशन थेटर असणार आहेत. संपूर्ण वातानुकूलित असणार्‍या या विभागात डॉक्टर, स्टाफ व रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. या विभागाचे प्रवेशद्वार स्वयंचलीत प्रवेशद्वार असणार आहे.

- Advertisement -

रसूलबाग येथे संरक्षण भिंतीचे भूमीपूजन

संदर्भ सेवा रुग्णालय व रसूलबाग कब्रस्थान यांच्या दरम्यान संरक्षण भिंतीचे देखील भूमीपूजन करण्यात आले. संदर्भ सेवा रुग्णालय कर्मचारी व मुस्लीम समाजाची बर्‍याच दिवसांची मागणी या मुळे पूर्णत्वास आलेली आहे. यावेळी संदर्भ सेवा रुग्णालयाचे अधीक्षक नामपल्ली, मीर मुकत्यार नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, सतीष सोनवणे , दीपाली कुलकर्णी, स्वाती भामरे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य पपू शेख, शिवा जाधव, गणेश कांबळे, सुनील देसाई, सचिन कुलकर्णी, हरिभाऊ लोणारी, गणेश मोरे, प्रतिक शुक्ल, नामा हजी, वासिम शेख, इरफान शेख, स्वाती कुलकर्णी, विजय बनसोड, जाकीर हाजी, युनुस तांबोळी, सुफी याकुब, वाहिद खान,रिझवान खान, रफिक शेख, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -