घरताज्या घडामोडीसिव्हिल इंजिनीअर निघाला अट्टल सोनसाखळी चोर, नाशिकमधील ४ सराफांसह ७ जणांना अटक

सिव्हिल इंजिनीअर निघाला अट्टल सोनसाखळी चोर, नाशिकमधील ४ सराफांसह ७ जणांना अटक

Subscribe

मैत्रीणीसोबत मौजमजेसाठी केली चोरी, चोरीच्या पैशांवर नाशिकमध्ये २० लाखांची एफडी, कार आणि फ्लॅटही घेतला

मैत्रीणीसोबत मौजमजा करण्यासाठी गेल्या ३ वर्षांपासून नाशिकमध्ये विविध भागांत सोनसाखळ्या चोरणार्‍या दंगल उर्फ उमेश अशोक पाटील या तरुणाला पोलिसांनी अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या उमेशने तब्बल ५६ गुन्हे केल्याचं पुढे आलंय.

नाशिकरोड भागातल्या जयभवानी रोड परिसरात राहणार्‍या उमेशने चोरीच्या पैशातनं फ्लॅट, कार घेतानाच २० लाखांची एफडीदेखील केल्याचं उघडकीस आलंय. उमेशने तब्बल ५६ गुन्हे केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिव्हिल इंजिनीअरचं शिक्षण घेतलेल्या उमेशने आडगाव शिवारातल्या तुषार ढिकले या मित्रासोबतही काही चोर्‍या केल्या. चोरी केलेल्या सोनसाखळ्या सराफ बाजारातल्या चार सराफांना विकल्या जात होत्या. यात सिन्नर फाट्यावरचा विरेंद्र निकम हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. या सर्वांना अटक केल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितलं. या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अर्थात मोक्कांतर्गत कारवाईची शक्यता आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -