घरउत्तर महाराष्ट्र१२वीचे विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर आले आणि समजले की मोबाईलच गायब आहेत

१२वीचे विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर आले आणि समजले की मोबाईलच गायब आहेत

Subscribe

नाशिक : राज्यभरात मंगळवार पासून शैक्षणिक जीवनात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या १२वीच्या परीक्षांना सुरवात झाली. मंगळवारी (दी.२१) इंग्रजीचा पहिलाच पेपर होता, मात्र हा पेपर ११ विद्यार्थ्यांसाठी चांगलाच आठवणीत राहणारा ठरला आहे. नाशिकरोड परिसरातील बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली. जेव्हा हे विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर आले तेव्हा बॅग मध्ये ठेवलेले मोबाईल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

खरतर मोबाईल हा आज मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. प्रत्येकाला मोबाईलची आवश्यकता भासते. कोरोना काळापासून तर ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी मोबाईल हा शिक्षासाठीचा महत्वाचा घटक बनला आहे. अश्यातच शहरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे विद्यार्थी व पालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी (दी.२१) इंग्रजी विषयाची परीक्षा होती. परीक्षा केंद्राच्या नियमा प्रमाणे केंद्राच्या आत परिक्षार्थी विद्यार्थ्यांना पेन व पॅड वगळता इतर कोणतेही साहित्य घेऊन जाण्यात मनाई असते. त्यामुळे नाशिकरोड परिसरातील बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आणलेल्या बॅग केंद्रा बाहेर किंवा गाडीच्या डीक्कित ठेवल्या. सोबतच आपले मोबाईलही त्या बॅग मध्ये ठेवले. मात्र, जेव्हा हे विद्यार्थी परीक्षा देऊन दुपारी २ वाजेच्या सुमारास बाहेर आले तेव्हा त्यातील तब्बल ११ विद्यार्थ्यांचे मोबाईल गहाळ झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विद्यार्थी परीक्षा केंद्रात असल्याची संधी साधत चोरांनी ११ मोबाईल लंपास केले आहेत. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -