घरताज्या घडामोडीइयत्ता पहिलीचे प्रवेश आता ऑनलाईन

इयत्ता पहिलीचे प्रवेश आता ऑनलाईन

Subscribe

प्राथमिक शिक्षण विभागाचा उपक्रम; 30 एप्रिलपर्यंत राबवणार प्रवेश प्रक्रिया

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळाही ‘लॉकडाऊन’ आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देण्याची अभिनव संकल्पना प्राथमिक शिक्षण विभागाने सुरु केली आहे. शाळानिहाय ऑनलाईन सर्वेक्षण व प्रवेशासाठी गुगल फॉर्मची लिंक तयार करून ग्रामस्थांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येते. त्यावर विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा शिक्षण विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी इयत्ता पहिलीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावून पालकांची मनधरणी करावी लागते. करोनाच्या काळात घरोघरी फिरणे अशक्य आहे. तसेच शाळा केव्हा सुरु होतील, याची अद्याप कोणतिही शाश्वती नसल्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांनी गट शिक्षणाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया अशी…
गावातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गावकर्‍यांच्या ग्रुपवर प्रवेशाची लिंक शेअर केली जाते. पात्र विद्यार्थी त्यालिंकवर जावून ऑनलाईन अर्ज भरु शकतो. प्रत्येक शाळेची वेगळी लिंक तयार करण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.
….
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु केले आहेत. तसेच आता इयत्ता पहिलीचे प्रवेशही ऑनलाईन करण्यासाठी केंद्र प्रमुखांना सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश दिला जाईल. येत्या 2 मे रोजी प्रवेशाचा आढावा घेतला जाणार आहे.
-डॉ.वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -