दहावी, बारावी विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईन

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे पाऊल; क्लासेसशी संपर्क साधण्याचे आवाहन

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनी दहावी व बारावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी सुरु केली आहे. क्लासेसचे शिक्षक आपल्या लेक्चर्सचे व्हिडिओ शुटींग करुन अपलोड करतात किंवा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचे काम सुरु केले आहे. ऑनलाईन वर्गांची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. परंतु, लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी आणि ऑनलाईन वर्गांचा झालेल्या प्रसारामुळे आता पालक स्वतःहून मागणी करु लागले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप याची माहिती मिळालेली नाही, त्यांनी अधिच्या क्लासेस चालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्यावतीने अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष अरुण कुशारे, सचिव सीए लोकेश पारख, खजिनदार अतुल आचलिया, ज्येष्ठ संचालक रमेश उपाध्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी 9823171342 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्लिश व विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठीच्या विविध संकल्पना समजणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पना फक्त वाचनाने, शिक्षकांशिवाय समजु शकत नाही. यासाठी संघटनेच्या सभासदांनी हा ऑनलाईन लेक्चर्सचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
-जयंत मुळे, अध्यक्ष (कोचिंग क्लासेस संघटना)