घरमहाराष्ट्रनाशिकट्रीपल सीट पोलिसांची क्लीप व्हायरल

ट्रीपल सीट पोलिसांची क्लीप व्हायरल

Subscribe

नाशिककरांना दंड करणारे पोलिसच नियम पाळत नसल्याने वाहनचालकांत संताप

नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरणार्‍या पोलिसांकडूनच शहरात वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. शहरात दोन पोलीस एका संशयितास दुचाकीवर घेऊन जात असल्याची चित्रफित शहरात व्हायरल झाली आहे. एकीकडे शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालक व ट्रीपल सीट जाणार्‍यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे शहर पोलीसच मनमानी पद्धतीने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलीस यंत्रणा कार्यान्वित आहे. कायदा व सुव्यवस्था हातात घेणार्‍या एका संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला वैद्यकिय तपासणीसाठी दोन पोलिसांनी दुचाकीवरून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन पोलिसांनी संशयितास दुचाकीवर मध्यभागी बसवून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालय ते भद्रकाली पोलीस ठाणेदरम्यान त्र्यंबकनाका सिग्नलवर पोलीस थांबले असता, त्यांच्याकडून झालेला वाहतूक नियमभंग शहरातील एका तरुणाने मोबाईलमध्ये चित्रित करीत सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केला. त्यानंतर शहरातील अनेकांनी शहर पोलिसांबद्दल संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून पोलिसांची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांनी १३ मेपासून हेल्मेटसक्ती करत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे शहर पोलीसच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. काही पोलीस विनाहेल्मेट दुचाकी चालवत आहेत. ट्रीपल सीट दुचाकी चालवताना वाहनचालक दिसून आल्यास संबंधित त्याच्याकडून दंड वसूल करतात. मात्र, वाहतुकीचे नियम न पाळल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणारी पोलीस यंत्रणा त्यांच्याच कर्मचार्‍यांवर कारवाई करणार की नाही, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

चौकशीचे आदेश दिले

पोलिसांनी संशयित गुन्हेगारास दुचाकीवरून ट्रीपल सीट घेऊन योग्य नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकारी वाहन उपलब्ध नसल्यास संबंधित पोलिसांनी संशयित गुन्हेगारास रिक्षातून घेऊ जाऊ शकत होते. – पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -