घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो

Subscribe

महाजनादेश यात्रेचा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार समारोप

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (ता. १९ )ला नाशिक येथे होणार असून यानिमित्ताने सकाळी ११.३० वाजता तपोवन येथील भव्य मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा रोड शो बुधवारी (ता. १९) दुपारी ३ वाजता नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या पाथर्डी फाटा येथून होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमांसाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण शहरात झेंडे, फलक, कटआऊट लावून वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे नाशिक भाजपमय झाल्याचे भासत आहे.

बुधवारी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून जनादेश यात्रेच्या समारोप टप्प्याला सुरुवात केली जाणार आहे. पाथर्डी फाटा, सिम्बॉयसिस कॉलेज, उपेंद्रनगर मार्गाने ही यात्रा उत्तमनगर येथे येणार आहे. तेथून पवननगर , सावतानगर, दिव्या अ‍ॅडलॅब सिनेमागृह मार्गाने त्रिमूर्ती चौक व तेथून सिटी सेंटर मॉल येथे यात्रा येणार आहे. सिटी सेंटर मॉलपासून ही रॅली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे पोहोचणार आहे. यावेळी यात्रेच्या समोर दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणाहून सर्व महिला, यात्रेत सहभागी झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मुख्यमंत्र्यांच्या यात्रे समवेत पायी पंचवटीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ऐतिहासिक सभा ठरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये होणार्‍या सभेस अडीच ते तीन लाखांचा जनसमुदाय येणार आहे. त्यामुळे ही नाशिक जिल्ह्यातील आजवरची ऐतिहासिक सभा ठरेल, असा मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांचा नाशिक शहरात रोड शो होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असून आता विरोधी पक्षांना काही जागा मिळतात की नाही याविषयीच साशंकता निर्माण झाली आहे. – गिरीश महाजन, पालकमंत्री

मोदींच्या सभेची तयारी पूर्णत्वास

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (ता. १९) दुपारी ११. ३० वाजता तपोवनात होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. तपोवनातील २६ एकर मैदानावर मोदींची सभा होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरुन हे मंडप वॉटर प्रुफ असतील. आजवर नाशिक जिल्ह्यात झाली नाही इतकी मोठी सभा ही होणार आहे. त्यासाठी नागरिकांना बसण्यासाठी तुर्तास सव्वा लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर मोदी प्रथमच उत्तर महाराष्ट्रात येत असल्याने त्यांना भेटण्यासाठी नाशिककर उत्सूक आहेत, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

सभेतील व्यवस्था अशी

  • २६ एकर जागेत सभा
  • १२ वॉटर प्रुफ मंडप
  • ५० स्क्रिन
  • १.२५ लाख खुर्च्यांची व्यवस्था
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -