मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या गाडीला अपघात

uddhav sister in law car accident

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हणी अमृता श्रृंगारपुरे शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन निघालेल्या असताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्यासह अजून दोन जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पांगरीनजीक श्रृंगारपुरे यांच्या एमएच ०४ इटी ३७२७ या झायलो कारला अपघात झाला. श्रृंगारपुरे यांच्यासोबत अजय विश्वनाथ कारंडे, मनीष मिश्रा, अभिषेक सिंह आणि मीना कारंडे असे पाचजण शिर्डीहून परत येत होते. त्यावेळी एका लहान पुलावरून कार खाली कोसळली. यामध्ये अमृता, मनीष मिश्रा, अभिषेक सिंह आणि मीना कारंडे असे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अजय कारंडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला.