थंडीचा कडाका, नाशिक ९ अंशांवर

सर्वात कमी तपमानाची नोंद निफाडला

ढगाळ हवामान, दाट धुकं आणि पाऊस अशा वातावरणामुळे शहरासह जिल्ह्यातल गारवा निर्माण झाला असला तरीही बोचरी थंडी मात्र गायब झाली होती. दोन दिवसांपासनं सूर्यदर्शन झाल्यानंतर ढगाळ वातावरण दूर झालं आणि थंडी परतू लागलीय. थंडीचा जोर वाढल्यानं आज पहाटे नाशिक शहराचा पारा ९ अंशावर आला होता. तर, जिल्ह्यात सर्वात कमी तपमानाची नोंद निफाडला झाली. या भागात पारा ८ अंशावर आला होता. त्यामुळं नाशिककरांना हुडहुडी भरली होती. शहरात दिवसभर गारवा कायम होता.