घरमहाराष्ट्रनाशिककॉम्बिंग ऑपरेशनमध्ये ६९ गुन्हेगारांसह २५ टवाळखोरांवर कारवाई

कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये ६९ गुन्हेगारांसह २५ टवाळखोरांवर कारवाई

Subscribe

नाशिक  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत शहरात ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत शहरात ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. त्यात नाकाबंदी, ड्रंक अँड ड्राईव्ह, तडीपार, टवाळखोर, ट्रिपलसीट वाहनांवर कारवाई करण्यात आली.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नांदुरनाका, सिन्नरफाटा, संसरीनाका, म्हसरूळगांव, राउ हॉटेल, अंबड टी पॉईंट, सिडको रुग्णालय, मालेगांव स्टॅण्ड, चोपडा लॉन्स, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायण बापूनगर, पाथर्डीफाटा, वडनेरगेट, भगूर नाका क्रमांक- २ या ठिकाणी नाकाबंदी करत ऑल आउट मिशन व कोंबिग ऑपरेशन राबविले. कारवाईत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त, ५ सहाय्यक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, ९९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५८३ पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

- Advertisement -

कोम्बिंगमधील कारवाई अशी…

रेकॉर्डवरील गुन्हेगार – ६९
वॉरंट, समन्स – ३४
हॉटेल, ढाबे तपासणी – २४
ड्रंक अँड ड्राईव्ह – ९
वाहन कारवाई -८१  
दंड वसुली – १६,८००
झोपडपट्टी तपासणी – २५
टवाळखोर कारवाई- २५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -