घरमहाराष्ट्रनाशिकपुरेसा ऑक्सिजन ठेवण्याच्या आयुक्तांच्या रुग्णालयांना सुचना

पुरेसा ऑक्सिजन ठेवण्याच्या आयुक्तांच्या रुग्णालयांना सुचना

Subscribe

नाशिकमधील नागरिकांना पुरेशी व दर्जेदार ऑक्सीजन सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चाही यावेळी झाली

रुग्णालयात उपलब्ध बेड्सच्या संख्येनुसार आवश्यक ऑक्सिजन साठा व त्यासोबत अतिरिक्त दोन दिवस पुरेल एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन साठवण क्षमता राहील असे नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.
महापालिका हद्दीतील ५० बेड्स क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या खासगी रुग्णालयांची बैठक पालिका मुख्यालयात घेण्यात आली. एप्रिल व मे महिन्यात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी भविष्यात निर्माण होऊ नयेत, या दृष्टीने ही बैठक झाली. शासनाच्या वतीने शहरातील ऑक्सिजन साठवण क्षमता व निर्मिती क्षमता वाढविणेबाबत सूचना करण्यात आलेल्या होत्या. सदर सूचनेनुसार या सर्व खासगी रुग्णालयांनी स्वतःचे रुग्णालयात उपलब्ध बेड संख्या नुसार आवश्यक लागणारा ऑक्सिजन साठा व त्यासोबत अतिरिक्त दोन दिवस पुरेल एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन साठवण क्षमता करण्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी खासगी रुग्णालयांना या बैठकीत दिल्या.

सर्व प्रथम सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी चांगल्या पद्धतीने साथरोग लाट हाताळण्यात यश प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून अभिनंदन केले. शासन निर्देशाप्रमाणे येणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येतील अशी शक्यता लक्षात घेता खाजगी रुग्णालयांमध्ये यापेक्षा अजून किती अतिरिक्त खाटा राखीव करण्यात येतील याबाबत आढावा घेतलेला आहे व त्यानुसार रुग्णालयांनी पुढील आठ दिवसात त्यांचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. त्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयांप्रमाणेच ऑक्सिजन साठवण क्षमता तातडीने वाढविणे व त्याबाबत नियोजन करणे व केलेले नियोजन महानगरपालिकेस कळविणे. या सर्वांमधून येणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये नाशिकमधील नागरिकांना पुरेशी व दर्जेदार ऑक्सीजन सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -