घरमहाराष्ट्रनाशिकआयुक्तांच्या 'सलाम-ए-इश्कला वन्स मोअर'; पालिकेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

आयुक्तांच्या ‘सलाम-ए-इश्कला वन्स मोअर’; पालिकेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

Subscribe

नाशिक : महापालिकेचा ४० वा वर्धापन दिनानिमित्त कालिदास कलामंदिरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी चक्क सलाम-ए-इश्क गाणे सादर केले. या गाण्याला उपस्थितांनी भरभरुन प्रतिसाद देत वन्स मोअरदेखील दिला.

महापालिकेचा वर्धापनदिन सोमवारी (दि. ७) उत्साहात साजरा झाला. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिका आयुक्तांसह आदिवासी सहकारी विकास महारमंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी ही वाट दूर जाते हे गाणे सादर केले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत एनएमसी सुपरकिंग संघाने विजेतेपद पटकावले. संघाचे कर्णधार डॉ. आवेश पलोड यांच्यासह क्रिकेट संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी केले. दरम्यान, यानिमित्त राजीव गांधी भवनातील प्रशासन विभागात सत्यनारायण पूजा झाली. प्रशासन विभागातील कर्मचारी नीलेश नवले व त्यांच्या पत्नी नीता नवले यांच्या हस्ते सकाळी पूजा झाली. पालिका प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी अतिक्रमण विभाग उपायुक्त करुणा डहाळे व कर्मचारी उपस्थित होते. सहायक आयुक्त जवाहरलाल टिळे, सहायक अधीक्षक रमेश बहिराम, शेखर चौरे, स्वीय सचिव सुनील ठाकूर, नीलेश नवले, अश्विनी ठाकरे, किरण तुपे, राजेंद्र बोरस्ते व कर्मचार्‍यांनी या पूजेचे नियोजन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -