घरमहाराष्ट्रनाशिकऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारदारांना मिळाले २० लाख

ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारदारांना मिळाले २० लाख

Subscribe

ग्रामीण सायबर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु

ऑनलाइन फसवणूक झाल्यावर नागरिक सायबर पोलिसांकडे तक्रार करतात. तक्रार करूनही रक्कम परत मिळेल की नाही, असा संभ्रम नेहमीच तक्रारदारांमध्ये असतो. मात्र, नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात दिलासादायक घटना घडली आहे. सायबर पोलिसांनी हायटेक चोरट्यांची मोडस ऑपरेंडी लक्षात घेत तपास करत मार्च ते जून २०१९ या चार महिन्यांत २० लाख रूपये तक्रारदारांना परत मिळवून दिले.

माहिती तंत्रज्ञानामुळे मोबाईल, सोशल मिडीया, ईमेल, इंटरनेटच्या मदतीने सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहेत. जिल्ह्यात ऑनलाइन ई-पेमेंट वॉलेटव्दारे नागरिंकाची आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांशी संपर्क साधत चोरटे बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवत ई-वॉलेटव्दारे नागरिकांना पैसे भरण्यास सांगत आहेत. त्यानंतर बँक खात्याची गोपनीय माहिती मिळताच खात्यावरून रकमेचा अपहार करीत आहेत. याप्रकरणी तक्रारी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विविध कंपन्यांच्या नोडल अधिकार्‍यांना एका प्लॅटफॉर्मवर आणले. नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधत ऑनलाइन चोरीची माहिती दिली. त्यामुळे पुढील व्यवहार पूर्णपणे थांबले. त्याअनुषंगाने कायदेशीर कार्यवाही करत फसवणूक झालेल्या ग्राहकांची रक्कम वाचवली. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, कल्पेश दाभाडे, प्रमोद जाधव, परिक्षित निकम, प्रकाश मोरे, सुनील धोकट यांनी केली.

- Advertisement -

असा लागला तपास

ऑनलाइन फसवणुकीची तक्रार येताच तपास सुरु केला. ओटीपी, बेनिफिशरी खात्याची चौकशी करत बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर रक्कम कोठे गेले त्याचा शोध लावला. तेथून रक्कम परत तक्रारदारांच्या खात्यावर जमा केली. -सुभाष अनमुलवार पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -