घरमहाराष्ट्रनाशिकविसर्जन मिरवणूक मार्गावरील स्मार्ट कामे पूर्ण करा

विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्मार्ट कामे पूर्ण करा

Subscribe

अधिकार्‍यांकडून मार्गाची पाहणी ; यंत्रणेकडून डागडुजी सुरू

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे मिरवणूकीस अडथळा ठरू नये याकरीता महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. या मार्गावरील स्मार्ट कामे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्याबरोबर मार्गावरील खड्डेे बुजविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सारडा सर्कल येथील वाकडी बारव ते गौरी पटांगण दरम्यान चार किलोमीटर मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आणि पूर्व, पश्चिम विभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. पंचवटी भागातील मालेगाव स्टॅण्ड सिग्नल, इंद्रकुंड, होळकर पुल, गौरी पटांगण, नांदूर घाट येथे सुरु असलेल्या कामांची समक्ष पाहणी करुन सूचना करण्यात आल्या. या ठिकाणी स्मार्ट सिटीकडून होणार्‍या कामांबाबत मोरे यांच्याशी चर्चा करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, मुख्य लेखापरीक्षक बोधीकरण सोनकांबळे यांनी लक्ष्मीनारायण घाट आणि कृत्रिम तलावांची पाहणी केली.

- Advertisement -

पंचवटी भागात शिंदे नगर ते ड्रीम कॅसल चौक या मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरीअलने बुजवण्यात आले आहेत. पश्चिम विभागात रविवार कारंजा परिसर, शालिमार परिसर येथे खड्डे भरुन पॅच वर्क करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील संगम घाटकडे जाणारा रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.

कामे पूर्ण झाल्याचा दावा

सातपूर-अंबड लिंकरोड येथील गणेश विसर्जन स्थळ ठिकाणी मंडप टाकणे, पाण्याचे कुंड ठेवणे ही कामे करुन परिसराची साफ सफाई करण्यात येत आहे. तसेच त्रंबक रोड, विश्वास बँक, आयटीआय पूल, खुटवड नगर रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. उंटवाडी रोड, पाथर्डी फाटा तसेच पूर्व विभागात इंदीरानगरातील चार्वाक चौकात, प्रभाग क्रमांक 23 वृंदावन नगर, प्रभाग क्रमांक 24 येथील सद्गुरु नगर आणि तपोवन रोडवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. याच विभागातील प्रभाग क्रमांक 15 मधील सोनजे मार्गावर रस्ता दुरुस्ती झाली आहे. तसेच मखमलाबाद मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरीअलने बुजवण्यात आले आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -