घरमहाराष्ट्रनाशिकलंडनच्या प्रदर्शनात कॉंक्रीटीकरणमुक्त गोदापात्र

लंडनच्या प्रदर्शनात कॉंक्रीटीकरणमुक्त गोदापात्र

Subscribe

‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या तत्वावर आधारित प्रदर्शन

गेल्या काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीपात्रातील ठराविक भागातील काँक्रीट काढण्यात आले. १७ प्राचीन कुंडांपैकी ५ कुंड पुनर्जीवित झाले असून, या कामाची दखल लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात घेण्यात आली आहे. यात ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या तत्वावर आधारित शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध उर्जा आणि वने ह्या क्षेत्रांतील १५९ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये ‘शुुद्ध पाणी’ या सदरात गोदावरी नदीपात्र कॉक्रीटीकरणमुक्त करून जिवंत जलस्रोत पुनर्जीवन या प्रकल्पचा समावेश झालेला असल्याची माहिती गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते देवांग जानी यांनी दिली.

या वर्षी आर्टीस्टिक डायरेक्टर एस.डेव्हलीन यांनी या प्रदर्शनाचे संकलन केले असून, हे प्रदर्शन १ ते २७ जून २०२१ च्या कालावधीत जगभरात पाहण्यास उपलब्ध आहे. यावर्षीचे प्रदर्शन ‘रेेझोनन्स अनुवाद’ या संकल्पनेवर आधारित आहे. यासाठी जगभरातून अशा प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, ज्यांच्यामुळे मुलभूत बदल घडू शकतो आणि ज्यांचे अनुकरण केल्यामुळे विवीध प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात. साधारण ५० देशांमधून या बिनाले प्रदर्शन करिता पर्यावरणस्नेही कामे मागवण्यात आली. ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या तत्वावर आधारित शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध उर्जा आणि वने आदी क्षेत्रातील १५९ प्रकल्पांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. यामध्ये ‘शुद्ध पाणी’ या सदरात गोदावरी नदीपात्र कॉक्रीटीकरणमुक्त करून जिवंत जलस्रोत पुनर्जीवन या प्रकल्पचा समावेश करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातील उर्वरित सीमेंट-कॉक्रीटचे थर काढणे गरजेचे असून, ते काढल्यास नदीत नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होऊ शकते. जिवंत पाणी पुरातन कुंडात प्राप्त होऊन नदी पुनःप्रवाही होऊ शकते. या संकल्पनेला आणि त्यासाठी लागू केलेल्या कॉक्रीट काढण्याच्या प्रकल्पाला दुजोरा मिळाला असल्याची माहिती, कॉक्रीटीकरणमुक्त गोदावरी नदीसाठी अविरतपणे ७ वर्षांपासून लढा देणारे याचिकाकर्ते व गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली.

Devang Janiही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, गोदावरी नदी पुनर्जीवन प्रकल्प जगप्रसिद्ध लंडन डिझाईन बिनाले प्रदर्शनीत समाविष्ट झाला. कॉक्रीटीकरणमुक्त गोदावरी नदी व त्यातून प्राप्त झालेले मुबलक नैसर्गिक जलस्रोत याची दखल जागतीक स्तरावर घेतली गेली. याबाबत नदी परिसरातील जिवंत जलस्रोतसाठी संशोधन अहवाल डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिला आहे.
– देवांग जानी, याचिकाकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -