घर उत्तर महाराष्ट्र बेळे यांच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध; औद्योगिक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तांकडे हल्लेखोरांच्या अटकेची...

बेळे यांच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध; औद्योगिक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तांकडे हल्लेखोरांच्या अटकेची मागणी

Subscribe

नाशिक : केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणारे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत घुसुन काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला व दहशत माजविण्याचा केलेला प्रयत्नाचा उद्योजक संघटना व सर्वच स्तरांतून निषेध होत असतानाच निमा तसेच , औद्योगिक संघटनांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली. या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी आणि तसे न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही शहरातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.

धनंजय बेळे हे केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्र आणि राज्यातील उद्योजकांचे नेतृत्व करतात.कोणत्याही उद्योजकावर अन्याय झाल्यास त्याच्या मदतीसाठी बेळेच प्रथम धाव घेतात व त्या उद्योजकास न्याय मिळवून देतात. नाशकात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी तसेच औद्योगिक वसाहतीचा विस्तार व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. असे असताना रविवारी (दि.२१) दुपारी काही समाजकंटक अंबड औद्योगिक वसाहतीतील एस. एस. एंटरप्राइजेस कंपनीच्या कार्यालयात घुसले व तेथील सामानाची नासधूस केली. तेथील महिला कर्मचार्‍यांशी अर्वाच्य भाषेत वक्तव्य करत शाई फेकण्याचा प्रयत्न केला खुर्चीला चपलांचा हार घालत शिवीगाळ केली व दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. निमा ही उद्योजकांची शिखर संस्था आहे. त्यामुळे बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे नाशिकचा औद्योगिक जगतावर झालेला झालेला हल्ला आहे, असे आम्ही समजतो. यामुळे उद्योग जगतावर विपरित परिणाम होऊन नाशिकची प्रतिमा खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.

- Advertisement -

भ्याड हल्लाबाबत स्वतः लक्ष घालुन ताबडतोब चौकशी करावी व त्या सर्व समाजकंटकांना अटक करुन त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निमा कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सिन्नर, इगतपुरी दिंडोरी, लखमापूर, पिंपळगाव, मालेगाव, येवला आदी ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील साडेतीनशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते आणि त्या सर्वांनीही बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. निवेदनावर निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, आयमा अध्यक्ष निखिल पांचाल आदींच्या सह्या आहेत.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कंपनी कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारे गुंडगिरीचाचाच आणि उद्योग जगताला आव्हान देण्याचाच हा प्रकार आहे.उद्योजकांच्या कार्यालयावर अशाप्रकारे हल्ले होत असतील तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही.पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन अशा शक्तींचा तातडीने बिमोड करावा.या प्रकरणात लक्ष घालण्याची तसेच उद्योजकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा,अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत. : ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -