घरमहाराष्ट्रनाशिकचंद्रकांत पाटील घेणार भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

चंद्रकांत पाटील घेणार भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

Subscribe

अंतर्भत गटबाजीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नाशिक दौर्‍याकडे लागले सर्वांचे लक्ष

स्थायी समितीवर प्रस्थापितांना देण्यात आलेले स्थान, नाशिक शहराची सुत्रे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे असतांनाही अन्य नेते निर्णय घेत असल्याने वाढत चाललेली नाराजी यातुन उफाळून आलेली गटबाजी यापार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नाशिक दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौर्‍यात पक्षीय कामकाजाच्या आढावा तसेच पदाधिकार्‍यांची झाडाझडतीही ते घेणार असल्याचे समजते.

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी, सध्या नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांमध्ये अंतर्गत खदखद अधून मधून उफाळून येत आहे. बससेवेच्या लोकार्पण सोहळयाच्या निमित्ताने ती समोर आली. नाशिक महापालिकेत सत्ता आणण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची केलेली घोषणाही महत्वपुर्ण ठरली. परंतू मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता तर महाजन गटाची नाकेबंदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच गटनेते आणि सभागृहनेते पदावर नव्याने झालेल्या नियुक्त्या हा त्याचाच एक भाग असल्याचेही बोलले जाते. पक्षांत नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचीही नाराजी आहे. पक्षाचे नेते नाशिक दौर्‍यावर येत असतांनाही याची कल्पनाही नगरसेवकांना न देता परस्पर कार्यक्रम आखले जातात अशीही काही नगरसेवकांनी नाराजी आहे. त्यामुळे शहराध्यक्षांविरोधातही मोठा गट पक्षात सक्रीय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाला ही नाराजी परवडण्याजोगी नाही त्यामुळे या दौर्‍यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात येणार आहे. पाटील यांचे शुक्रवारी (दि. १७) रोजी सांयकाळी पाटील यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असून रविवार (दि. १८) रोजी सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -