घरमहाराष्ट्रनाशिकअंजनेरी गडाच्या रस्त्यावरुन ग्रामस्थ-पर्यावरणप्रेमी आमने-सामने

अंजनेरी गडाच्या रस्त्यावरुन ग्रामस्थ-पर्यावरणप्रेमी आमने-सामने

Subscribe

ग्रामस्थांची रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चेबांधणी, पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम

मुळेगावमार्गे अंजनेरी गडावर प्रस्तावित रस्त्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपानंतर
स्थगिती दिल्यानंतर आता ग्रामस्थांनीही मुळेगावमार्गे रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. रस्त्यासाठीचे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आल्याने हा मुद्दा मात्र चांगलाच तापला आहे.

अंजनेरी रस्त्याचे समर्थक वृक्षारोपण करून पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधक वृक्षारोपण करा ते जगवा त्यानंतर १० वर्षांनी रस्ता करा, असा अवास्तव पर्याय सांगत आहेत. अंजनेरी गडावर दुर्मिळ वनस्पती असून, महाराष्टात फक्त येथेच गिधाडाची ४५० घरटी आहेत. गडावर वाडे, पाडे, घरे नाहीत, मग रस्त्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल करत अंजनेरी संयुक्त वनसमितीचे अध्यक्ष राजेद्र बदादे यांनी अंजनेरी गाव रस्त्याला विरोध करणार असल्याचे सांगितले. तर, दोनच दिवसांपूर्वी परिसरातील गावांनी एकत्र येत रस्त्यासाठी संघटित समर्थनाचा ठरावही केला. दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा रस्त्यास विरोध करत अंजनेरी मार्ग असलेला रस्ताच पक्का करून येथून रोप-वे तयार करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

वैयक्तिक स्वार्थासाठी समर्थन?

मुळेगावमार्गे अंजनेरी गडावर जाणाऱ्या रस्त्याने काही ठराविक लोकांचा फायदा असल्याने ते लोक सर्वसामान्यांना यात आणत आहेत. मुळेगावमार्गे प्रस्तावित रस्त्यालगत एका व्यक्तीची दुतर्फा १०० एकरहून अधिक जमीन असल्याने त्याच्या स्वार्थासाठीच मुळेगावमार्गे रस्त्याचे समर्थन केले जात असल्याची चर्चा नागरिकांमधून होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -