घरमहाराष्ट्रनाशिकदेवळाली सेना-राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी!

देवळाली सेना-राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी!

Subscribe

बोगस मतदार यादी प्रकरण; नगराध्यक्षा करंजकर, दीपक बलकवडे, अनिता ढगेंसह ३६०० मतदारांवर आक्षेप

नाशिकरोड : भगूर नगर परिषदेच्या मतदार यादीत हजारो बोगस मतदार असल्याच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षा अनिता करंजकर, नगरसेवक दीपक बलकवडे, नगरसेविका अनिता ढगे, संगीता पिंपळे आदींसह ३६०० लोकांच्या नावावर आक्षेप घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली आहे. देवळालीत आजी माजी आमदारांच्या वादानंतर भगूर नगरपरिषदेवरून राष्ट्रवादीने थेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनाच लक्ष्य केल्याने पुन्हा एकदा वाद पेटला आहे.

भगूर नगरपरिषदेच्या मतदार यादीत हजारो बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आक्षेप घेत तक्रारीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या चौकशीत चक्क नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, काही नगरसेवक व नगरसेविकांसह ३६०० नावे काढण्यासाठी आक्षेप घेतला आहे. यामुळे प्रशासनाकडून अशा मतदारांना हरकत नोटीस पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भगूर नगरपरिषदेच्या सत्ताधार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.

- Advertisement -

देवळाली मतदारसंघातील आजी-माजी आमदारांतील वाद शांत होतो न होतो, तोच भगूर नगरपरिषदेच्या बोगस मतदारांवरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीच्या वादाची ठिणगी पडली आहे. भगूर नगरपरिषदेच्या मतदारयादीत असलेल्या हजारो बोगस मतदारांच्या जीवावर सत्ताधारी सत्ता उपभोगत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. बलकवडे यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मतदार यादीतील बोगस मतदारांची नावांची यादी जिल्हाधिकार्‍यांना दिल्यानंतर प्रशासनाकडून शहानिशा करणे व बीएलआेंमार्फत हरकती नोटीसा बजावण्यात येत आहेत.

या नावांत चक्क सत्ताधारी नगरसेविका अनिता ढगे यांचे व कुटुंबियांच्या नावावर आक्षेप घेतल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. त्यात वेताळबाबा रोड परिसरात ३० ते ४० वर्षांपासून राहात असलेल्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे सांगितले आहे.

वेताळ बाबा परिसर हा भगूरच्या हद्दीत नसताना भगूर नगरपालिकेने त्या ठिकाणी पाणी, रस्ते, लाईट कोणत्या निधीतून दिले. वेताळ बाबा परिसर हा भगूरच्या हद्दीत नसताना भगूर नगरपालिकेने त्या ठिकाणी पाणी, रस्ते, लाईट कोणत्या निधीतून दिले. याची चौकशी करण्यात यावी.
– प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला आघाडी

सदर लोकप्रतिनिधी जनतेतून व मतदारांनी गेल्या वीस वर्षांपासून सतत निवडून आलेले असतांनाही त्यांच्यासह ३६०० बोगस नावे असल्याचा आक्षेप घेतला आहे. एक महिन्यापासून शासनाने सदर मतदार यादीप्रमाणे सर्वेक्षण सुरु केले आहे. हा सरळ सरळ निवडणूक आयोगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न असून मतदारांचा हक्क कायम ठेवावा. – काकासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष, भगूर

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -