घरमहाराष्ट्रनाशिकमतदार याद्यांचा घोळ; ३८४७ हरकती प्राप्त, सिडकोतून सर्वाधिक

मतदार याद्यांचा घोळ; ३८४७ हरकती प्राप्त, सिडकोतून सर्वाधिक

Subscribe

नाशिक : नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याच्या तक्रारी असून हरकती व सूचना दाखल करण्याच्या मुदतीत सर्वाधिक ३८४७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यात नवीन नाशिक विभागातून सर्वाधिक २४३३ म्हणजे ६५ टक्के हरकती दाखल झाल्या आहेत. शहरातील सर्वच प्रमुखपक्ष तसेच, राज्यातील सत्ताधारी भाजपदेखील मतदार यादीच्या गोंधळावर आक्रमक झाल्याचे बघून आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्वतः प्रत्येक प्रभागात फिरून हरकतींची शहानिशा सुरू केली आहे. त्यामुळे हरकतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पालिकेच्या प्रभागरचनेपासूनच सोयीने प्रभागरचना केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता मतदार यादीतही मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करत कुणाच्या तरी दबावाखाली ही नावे बदलण्यात आल्याचा आरोप होत आहे. मार्च महिन्यात अपेक्षित असलेली महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही प्रक्रिया आता सप्टेंबर महिन्यात सुरू होणे अपेक्षित असून, ही बाब लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने प्रभागामधील सर्वसाधारण अनुसूचित जाती, जमाती तसेच महिला आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण केली.

- Advertisement -

त्यानंतर 23 जून रोजी महापालिकेच्या वतीने सहा विभागात प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना सहा प्रभागांमध्ये गोंधळ घातल्यामुळे तब्बल 30 तासानंतर शहरातील 44 प्रभागांमधील प्रारुप मतदारयादी पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अपडेट होऊ शकली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह इच्छुकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऑनलाईन मतदारयादी पाहून इच्छुकांना मोठा धक्का बसला.

एकेक मतदाराची तपासणी करण्यामुळे 1 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार नाही, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून होत असल्याचे पाहून महापालिकेने मुदतवाढीसाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला. त्यानुसार 3 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली. त्यानुसार ४ जुलैपर्यंत ३,८४७ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -