घरमहाराष्ट्रनाशिककौतुकसोहळा सेल्फी अन् मोदक बनवणाऱ्या विजेत्यांचा

कौतुकसोहळा सेल्फी अन् मोदक बनवणाऱ्या विजेत्यांचा

Subscribe

गणपती उत्सवात अधिक रंग भरण्यासाठी आपलं महानगर, माय महानगर मानिनी, लायन्स क्लब ऑफ नाशिक, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा घेण्यात आली. या पर्यावरण स्नेही स्पर्धेत स्पर्धकांनी अनेक सामाजिक संदेश देणार्‍या घरगुती बाप्पासमोरील देखाव्यांसमवेत सेल्फी ‘आपलं महानगर’ला पाठवले. यातील अकरा विजेत्यांना मंगळवारी (दि. २६) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आलीत. त्याचप्रमाणे आपलं महानगर, माय महानगर, माय महानगर मानिनी, इनरव्हिल क्लब नाशिक जेन नेक्स्ट, कोकण पर्यटन विकास संस्था आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोदक बनवण्याची स्पर्धाही मंगळवारी घेण्यात आली.

आपलं महानगरच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच प्रोत्साहन दिले जाते. हा उपक्रम खरोखरचं कौतुकास्पद आहे. आजपर्यंत मी मोदकांचे एक किंवा दोन प्रकार बघितले परंतु येथे आल्यानंतर मोदकांचे इतके प्रकार पाहून आश्चर्य वाटले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपलं महानगरने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘सेल्फी विथ बाप्पां’च्या माध्यमातून सोशल मिडीयाचा जनजागृतीसाठी वापर कौतुकास्पद आहे. आज घडणार्‍या गुन्ह्यांपैकी ९९ टक्के गुन्हे हे सायबर क्राईमशी संबधित आहे. विशेष म्हणजे १६ ते २५ वयोगटातील तरूण, तरूणी या जाळयात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या स्वतःचे वैयक्तिक फोटो काढून ते शेअर करू नका. तसेच कोणतीही वैयक्तिक स्वरूपाची माहिती सोशल मिडीयातून शेअर करू नका. महिला, तरूणी यांनी विशेष करून खबरदारी घ्यावी. : सारिका अहिरराव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका 

- Advertisement -

महानगरच्या स्पर्धांना भरभरुन प्रतिसाद

आपले सण, उत्सवही पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरे व्हावे याकरीता ’आपलं महानगर’ नेहमीच प्रयत्नात असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने गणेशभक्तांना प्रोत्साहन दिले. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी या उपक्रमात नाशिककरांचा सहभाग वाढत आहे. त्याचप्रमाणे मोदक स्पर्धेच्या माध्यमातून गृहीणींना आपल्या पाककृती सादर करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. या दोन्ही स्पर्धांना गणेश भक्तांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. : हेमंत भोसले, निवासी संपादक, आपलं महानगर

पर्यावरण रक्षणासाठी इनरव्हीलचा पुढाकार

इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट ही एक जागतिक संस्था आहे. या संस्थेचा कारभार हा महिला वर्ग चालवतात. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना आदिवासी वाडया, पाडयांवर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात याकरीता शाळा खोल्या बांधून देणे, शाळेच्या भिंती रंगवणे, विद्यार्थ्यांना बेंच उपलब्ध करून देणे. तसेच लायब्ररी उपलब्ध करून देण, अनाथाश्रम, वृध्दाश्रमातही विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. ‘आपलं महानगर’च्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेनेही पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.आज निर्माल्य किंवा कोणतेही पुजा साहित्य हे गंगेत विसर्जित केले जाते किंवा ते गंगेतच विसर्जित करावे अशी एक भावना अनेकांच्या मनात असते. परंतु यामुळे नदीचे प्रदुषण होते. याकरीता संंस्थेच्या माध्यमातून निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याचे प्रशिक्षणही संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. : सरोज दशपुते, अध्यक्षा, इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट

- Advertisement -

मोदकाची मूळ संकल्पना जपावी

गणरायाचा आवडता मोदक म्हणजे जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करणारा पदार्थ. मोदक म्हटले की, तळणीचे मोदक आपल्याला आठवते. परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारचे मोदक बघायला मिळाले. आपल्या आवडी निवडी बदलल्या तसे मोदकानेही आपले स्वरूप बदलले. आजकाल विविध व्हायराटीचे मोदक गृहीणी बनवू लागल्या. मोदक हा आरोग्याशी निगडीत आहे त्यामुळे मोदक तयार करतांना त्याचे मूळ रूप जपावे. आपण कधी चायनीज किंवा जापनीज मोमोज बघितलेत का? त्यामुळे मोदक तयार करतांना या खाद्यपदार्थाची मुळ संकल्पना जपावी. आजकाल सेल्फिचे मोठे क्रेझ तरूणांमध्ये आहे हिच बाब हेरून दैनिक आपलं महानगरने सेल्फीला गणेशोत्सवाशी जोडत एक चांगला उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. दैनिक महानगर नेहमी समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होत प्रोत्साहन देत असतो. : वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल लायन्स क्लब नाशिक पंचवटी

पाककलेतून रोजगाराच्या संधी

बाप्पाचे मोदक आपल्याला मोठा रोजगार मिळवून देवू शकतात याकरीता महिलांनी पुढे येऊन आपल्या पाककृतींचे ब्रॅण्डिंग करावे. महाराष्ट्रात पक्वान्नांचे स्वाद-सुगंध, स्वरुप- शैली इतक्या आहेत, की हे पदार्थ सेवन करणे म्हणजे पर्वणीच असते. आपल्या पाककृतींचे सादरीकरण आणि ब्रॅण्डिंग होणे गरजेचे आहे. आज जेव्हा आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात जातो तेव्हा कोकणी खाद्यपदार्थांना पर्यटक मोठी पसंती देतात. तसेच आपल्याकडे येणार्‍या पर्यटकांना जर येथील अस्सल सुग्रास खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी मिळाली तर या माध्यमातून निश्चितच रोजगार निर्माण होऊन लाखोंची उलाढाल होऊ शकते. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रीयन जेवणाची चव चाखावी अशी पर्यटकांची इच्छा असते याकरीता नाशिकच्या पंचवटी भागात जुन्या वाडयांमध्ये मराठमोळया पध्दतीने जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे अनेक महिलांना रोजगार निर्माण झाला. त्यामुळे आपल्याला स्पर्धेशिवाय पर्याय नाही. : दत्ता भालेराव, संचालक कोकण पर्यटन विकास संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -