घरमहाराष्ट्रनाशिकतिकीटाच्या साकड्यासाठी थेट दिल्लीवारी!

तिकीटाच्या साकड्यासाठी थेट दिल्लीवारी!

Subscribe

काँग्रेसकडून इच्छुकांची सोनिया, राहूल गांधींची भेट

काँग्रेस पक्षातून आऊटगोईंगचा शिलशिला सुरू झालेला असला तरी या नकारात्मक स्थितीत संधीचे सोने करून घेणार्‍या काँग्रेसजनांची संख्या कमी नसल्याचे चित्रही या पक्षात आहे. नाशिक शहरातील विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावू म्हणून इच्छुकांनी थेट दिल्लीवारी केली. दिल्लीत पक्षांच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेत उमेदवारीसाठी साकडे घातल्याने दिल्ली वारी चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.

काँग्रेस पक्षाला सध्या संघटनावर भर देण्याचे निर्देश दिल्लीश्वरांनी दिलेले असले तरी, त्याकडे दूर्लक्ष करीत विधानसभा निवडणूकीच्या तयारीत बासिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी थेट दिल्ली गाठण्याचा पायंडा काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच पाडला गेला असावा. त्यामुळे काँग्रेसमध्ये तिकीटासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे, अशी टीकाही आता विरोधकांकडून सुरू केली आहे. सोमवारी दिल्लीत नाशिक शहरातून गेलेल्या काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी आपल्या सोबत इच्छुकांची मोळी बांधलेली होती. यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील मातब्बरांपेक्षा नवख्यांची संख्या अधिक होती. या इच्छुकांमध्ये स्थानिक संघटनात अल्प योगदान असणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने दिल्लीचा दौरा काँग्रेसच्या शहर वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे.

- Advertisement -

काँग्रेसही चळवळ मानणार्‍या आणि पदांची उतरंड पाळणार्‍या कार्यकर्त्यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे आणि तिकीटासाठी दावेदारी करण्याची निहीत प्रक्रिया प्रदेशस्तरावर सूरू असताना दिल्लीत बड्या नेत्यांकडे हजेरी लावणे आणि तिकीट मागणे, ही वृत्ती येथील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनाही कितपत रूचली असेल, हे सध्या सुरू झालेल्या टीका-टिप्पणीवरून लक्षात येऊ लागले आहे. काँग्रेस कमिटीत गत महिन्यात पक्षाचे नेते भाई जगताप आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्याचबरोबर काहींनी त्यावेळी प्रत्यक्ष येत उमेदवारी मागितली होती. तर काहींनी प्रदेशस्तरावर अर्ज पाठवून इच्छुकता दर्शवली होती. मात्र, काही इच्छुक असेही होते. की त्यांना येथील मातब्बरांना चेकमेट करून उमेदवारी मिळवण्याची इच्छा होती. त्यापैकीच काही जणांनी दिल्लीकडे प्रयाण केले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये विभागीय मेळावा घेताना उमेदवारीसाठी इच्छुकांचे कान उपटताना प्रथम संघटनावर भर देत आपले योगदान या कार्यात किती आहे, याचे पुरावे देण्याचे सूचवले होते. मात्र दीड महिन्यात संघटन बळकटीकरण कमी, पण पक्षात असलेले पदाधिकारीच इतर पक्षाच्या गोटात सामील झाले. त्यात इगतपुरी-त्र्यंबक विधान सभा मतदार संघातील निर्मला गावित यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्हा परिषदेतही काँग्रेसच्या गटाने शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेवरही काँगे्रेसला स्थान ठिकविता आलेले नाही.

- Advertisement -

काँग्रेस पक्षात संघटन करण्याचे कोणतेही योगदान नाही. त्याचबरोबर आहे त्या सत्तास्थानातूनही काँग्रेसला खिंडार पडत चालले आहे. त्याचबरोबर सध्या निवडणूकीच्या तयारीचे कोणतेही मुद्दे उचलून आंदोलन होत नसताना शहरातून दिल्लीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्लीतील बड्या नेत्यांनी कशाच्या आधारे तिकीटाचा विचार करावा, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या इतर कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये उमटू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -