घरमहाराष्ट्रनाशिकनेते नव्हे, कार्यकर्ते जोडा!

नेते नव्हे, कार्यकर्ते जोडा!

Subscribe

भाजपच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे आवाहन; सर्वच मतदारसंघात तयारीच्या सूचना

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता त्यांचे विद्यमान आमदारही पक्षसोडून भाजपमध्ये प्रवेश करु इच्छितात. मात्र, भाजपला आता नेत्यांची नव्हे, तर कार्यकर्त्यांची गरज आहे. दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडून बूथरचना अधिक मजबूत करण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी आढावा बैठकीत केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली असून पक्ष पदाधिकार्‍यांची रविवारी (दि.30) वसंतस्मृती कार्यालयात आढावा बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने भाजपमध्ये येणार्‍यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मोठे नेते आता भाजपकडे आकर्षित होत असून त्यांना समाविष्ट करून घेण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पक्षाला आता नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची गरज आहे. बूथरचना व कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केल्यामुळे कार्यकर्ते पक्षासाठी महत्वाचे ठरतात. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हळूहळू साकार होत असून विरोधकांना प्रचारासाठी कार्यकर्तेच मिळणार नाहीत, यावर लक्ष देण्याचे आवाहन महाजन यांनी केले. यावेळी खासदार डॉ.भारती पवार, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, निरीक्षक शशिकांत वाणी, आमदार डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, एन. डी. गावित, सुनील बच्छाव, पंकज खताळ यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्ह्यातील 15 जागा जिंकणार

लोकसभा निवडणुकीप्रमाणे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती ठरलेली असताना भाजप प्रत्येक मतदारसंघात लढण्याची तयारी करत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 जागांवर लढण्याची तयारी ठेवा, त्यादृष्टीने बूथरचना करण्याचे आवाहन देखील महाजन यांनी केले. प्रत्येक मतदारसंघात तयारीच्या सूचना देत महाजन यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत तर दिले नसावे ना, असा प्रश्न पक्षातील पदाधिकार्‍यांना पडला आहे.

पन्नाप्रमुखांना प्राधान्य

भाजपचे संघटन कौशल्य अधिक मजबूत करण्यासाठी युवकांना सभासद करून घेतले जाणार आहे. त्यासाठी एक क्रमांक देण्यात आला असून त्यावर मिस्ड कॉल देऊन सभासद नोंदणी करण्यात येईल. पन्नाप्रमुखांची इमेज हा मतदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय असल्याने त्यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांचे सादरीकरण करण्याचे आवाहन महाजन यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -