घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकहून चेन्नई, तिरूअनंतपूरम, कोलकातासाठी कनेक्टिंग फ्लाईट

नाशिकहून चेन्नई, तिरूअनंतपूरम, कोलकातासाठी कनेक्टिंग फ्लाईट

Subscribe

नाशिक : इंडिगो कंपनीकडून येत्या १५ मार्च पासून नागपूर, गोवा आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करण्यात येत असून, या सेवांचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. या तीन शहरांना नाशिकहून थेट विमानसेवा सुरू होणार असली तरी या सेवांच्या माध्यमातून तिरूअनंतपुरम, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू इ. प्रमुख शहरांना कनेक्टिंग फ्लाईटची सेवाही उपलब्ध होणार असल्याने नाशिकच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळण्याचे संकेत आहेत.

इंडिगोकडून सुरू करण्यात येणार्‍या सेवांचे तिकिट दरही जाहीर करण्यात आले आहेत. यात अहमदाबादसाठी २८०० रूपये तर, गोव्यासाठी २६०० रूपये तिकिटदर निश्चित करण्यात आला आहे. या सेवांचे बुकिंग सुरू होताच प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सध्या या कंपनीची नाशिक-हैदराबाद, नाशिक-दिल्ली या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. इंडिगोच्या सेवांमुळे नाशिकच्या विमानसेवेला वेग लाभणार आहे. या सेवेमुळे गोव्याला अवघ्या दोन तासांत पोहोचता येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर शहरांचेही अंतर कमी होणार असल्याचे व्यापार, उद्योगाला चालना मिळणार आहे.

- Advertisement -
अशी असेल सेवा

नाशिकहून गोव्यासाठी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी उड्डाण घेणारे विमान १ वाजून १० मिनिटांनी गोव्याला पोहोचेल. गोव्याहून १ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण घेतल्यानंतर हे विमान ३ वाजून २५ मिनिटांनी नाशिकला पोहोचले. नाशिकहून अहमदाबादसाठी ३ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करणारे विमान ५ वाजून २५ मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. तर, अहमदाबादहून ५ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण घेणारे विमान ७ वाजून २५ मिनिटांनी नाशिकला पोहोचेल. याशिवाय नाशिक-अहमदाबाद विमानसेवेद्वारे बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, जयपूर, कोची, वाराणसीसाठी अहमदाबादमार्गे कनेक्टिंग फ्लाईट उपलब्ध असेल.

नाशिकमधून देशातील प्रमुख शहरांना हवाई सेवेव्दारे जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे नाशिकच्या उद्योग, पर्यटन आणि व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे नाशिकमध्ये आयटी उद्योग, तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल शिवाय शहराचा विकासही झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. : मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, आयमा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -