घरउत्तर महाराष्ट्रआठवडयातून एक दिवस शहरातील पाणी कपातीचा विचार; अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासन...

आठवडयातून एक दिवस शहरातील पाणी कपातीचा विचार; अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासन अर्लट

Subscribe

नाशिक : हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला ‘अल निनो’ वादळाचा संभाव्य इशारा लक्षात घेता राज्य शासनाने पाणी टंचाई व कडक उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असून तसे झाल्यास शहरात पाणी टंचाईचे संकट ओढावू शकते म्हणूनच दोन महिने आधीपासूनच पाणी कपातीबाबत निर्णय घेण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असून तसा तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानूसार नाशिककरांना आठवडयातून एक दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणांचा जिल्हा मानल्या जाणार्‍या नाशिकमधून मुंबई आणि मराठवाडयासाठी पाणी पूरवठा केला जातो. त्यामुळे नाशिकला नेहमी मुबलक पाणीसाठा असतो. मात्र यंदा अल निनोमुळे पाऊस लांबण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणी पूरवठा केला जातो. आजमितीस गंगापूर धरणांत ६४ टक्के इतर जिल्हयातील १६ धरण प्रकल्पांत ४८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी धरणांमध्ये मार्च अखेर ५४ टक्के इतका जलसाठा होता. त्यामुळे आगामी आवर्तने व उन्हाळयामुळे होणार्‍या बाष्पीभवनाचे प्रमाण पाहता ग्रामीण भागात पाणी टंचाई उभी राहू शकते. नाशिक शहरात हा धोका नसला तरी, अल निनो वादळाचा हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता गेल्याच आठवडयात राज्य सरकारने सर्व नगरपालिका, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते यंदा उष्णतेचे प्रमाण अधिक राहणार असून, पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उष्णतेचे प्रमाण पाहता धरणातील पाण्याचे अधिक वाष्पीभवन होऊन मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच जनतेतही पाणी बचतीविषयी जागृती करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी महापालिका, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध साठा व आगामी काळात लागणारे पाणी याचा आढावा घेतला.

आढावा घेतल्या नंतर त्यात सर्व विभागांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कदाचित पाऊस जून महिन्यात पडला नाही तर त्यावेळी पाणी कपात करण्यापेक्षा दोन महिने आधीच पाणी कपात करण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसे झाल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवडयापासून ही अंमलबजावणी केली जाणार आहे. पाणी कपातीसंदर्भात नाशिकमध्ये दर महिन्याला बैठक होणार आहे. त्यामध्ये आढावा घेऊन पाणीकपात वाढवणे किंवा कमी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता आणि उपलब्ध माहितीनूसार दर महिन्याला पाणी कपातीचा एक दिवस वाढवला जाणार असल्याचेही समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -