घरताज्या घडामोडीकंत्राटी कर्मचार्‍यांनाही 50 लाखांचे विमा कवच

कंत्राटी कर्मचार्‍यांनाही 50 लाखांचे विमा कवच

Subscribe

सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय; खासगी रुग्णालय व सेवानिवृत्तांनाही लाभ

नाशिक : करोनाच्या काळात आरोग्य सेवा पुरवणारे शासकीय कर्मचारी किंवा खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची म्दत दिली जाणार आहे. या कर्मचार्‍यांमध्ये आता कंत्राटी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचाही सार्वजनिक आरोग्य विभागाने समावेश केला आहे. रुग्णावर उपचार करणारे, तपासणी करणार्‍या सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना 90 दिवसांसाठी 50 लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच दिले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 28 मार्च रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी, सेवानिवृत्त, कंत्राटी व रोजंदारीवरील कर्मचार्‍यांचा समावेश केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सहाय करणारे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी, केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व रुग्णालयांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांचा यात समावेश केला आहे. न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीच्या माध्यमातून अपघात विमा योजनेंतर्गत ही मदत दिली जाणार आहे.
&
जिल्ह्यात सुमारे 24 हजार कर्मचारी
जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस असे साधारणत: 12 हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्स, एएनएम व अशा असे साधारणत: 12 हजारांवर कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत सुमारे 24 हजार कर्मचार्‍यांना विमा कवच लाभले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -