घरमहाराष्ट्रनाशिकमहिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी कामगारांचा संप मागे

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी कामगारांचा संप मागे

Subscribe

कंपनीच्या व्यवस्थापनाशी चार तास यशस्वी चर्चा केल्यानंतर कामगारांच्या मागण्या मान्य

गेल्या सोळा दिवसापासून महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कामगार विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आदींनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे यश न आल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे याबाबत व्यथा मांडल्या.

राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कामगारांना दिल्यानंतर गुरुवारी (दि. १७) महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे मुंबई येथील सरचिटणीस सचिन गोळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुका अध्यक्ष मुलचंद भगत, रेल्वे कामगार सेना अध्यक्ष शत्रू भागडे, उपतालुका अध्यक्ष भोलनाथ चव्हाण, उपतालुका अध्यक्ष जनार्दन गतीर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश उगले, मनविसे प्रताप जाखेरे, इगतपुरी शहर अध्यक्ष सुमित बोधक, उपशहर अध्यक्ष राज जावरे, विद्यार्थी सेनेचे विलास भगत यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चार तास यशस्वी चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या विविध मागण्या मान्य केल्या. अखेर १६ दिवस पुकारण्यात आलेला संप कामगारांनी मागे घेतला. महिंद्रा कंपनीतील व्यवस्थापनाने कामगारांचे प्रश्न मार्गी लावल्याने १६ दिवसांपासून चाललेल्या कामगार आंदोलनाला अखेर यश आले. यावेळी कामगारांनी नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुका अध्यक्ष मुलचंद भगत आदींचे आभार मानले. यावेळी कामगारांनी मनसे कामगार सेनेच्या युनियनची महिंद्रा कंपनीच्या गेटवर स्थापना करून युनियनचे फलक लावण्यात आले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -