नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेत गटसचिवांच्या नावाने झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आणि स्वीय सहायक वाय. के. पाटील यांना चौकशीत दोषी ठरविण्यात आलेले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची फेरनियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कर्मचार्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पिंगळे आणि पाटील यांना कामावर घेतल्यास आम्हालादेखील कामावर घ्या, अशी मागणी दिंडोरी येथील बडतर्फ केलेल्या कर्मचार्यांनी प्रशासकांकडे केली आहे.
हेही वाचा : IMPACT जिल्हा बँक बेकायदेशीर निधी ऑडिओ क्लिप; पिंगळे, पाटील सक्तीच्या रजेवर
जिल्हा मध्यवर्ती बँकेत गटसचिवांना प्रोत्साहन निधी देण्याच्या बहाण्याने दिंडोरी, कळवण, देवळा या शाखेतून बेकायदेशीरपणे मोठ्या रकमा काढण्यात आल्या होत्या. या रकमा काढण्याचे आदेश वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे व वाय. के. पाटील यांच्या आदेशाने काढल्याचे समोर आले होते. त्यानुसार या प्रकरणाला आपलं महानगरने वाचा फोडली. या संशयास्पद प्रकरणाची ऑडिओ क्लिपदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील सहभाग स्पष्ट झाल्याच्या संशयावरुन वादग्रस्त अधिकारी पिंगळे व स्वीयसहायक वाय. के. पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.
हेही वाचा : जिल्हा बँक ऑडिओ क्लिप प्रकरण : कारवाईच्या धाकाने चेहरा झाकून रिकामे केले पिंगळे, पाटलांचे लॉकर
दरम्यानच्या काळात अॅड. लोखंडे यांनी सखोल चौकशी केली. त्यात त्यांच्यावरील आरोप सिध्द झाल्याचे बडतर्फ कर्मचार्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मात्र, असे असताना त्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली वाढल्या असून, एवढ्या मोठ्या प्रकरणात दोषी असतांनाही त्यांना निलंबित करणे अपेक्षित असताना कामावर घेतले जात असून, आम्हालादेखील कामावर घ्यावे, अशी मागणी दिंडोरी येथील बडतर्फ कर्मचारी परशुराम भोई, एस. ए. साठे, डी. एस. बोंबले यांनी प्रशासकांकडे केली आहे.
ऑडिओ ऐका : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रोत्साहन निधी अपहारप्रकरणी आणखी एक ऑडीओ क्लिप समोर