घरCORONA UPDATEनाशिक शहरात करोनाचा दुसरा बळी

नाशिक शहरात करोनाचा दुसरा बळी

Subscribe

नाशिक जिल्ह्यात करोनाचे थैमान सुरु असून, शनिवारी (९) सकाळी नशिक शहरातील आडगावजवळील कोणार्कनगरमधील एका ५१ वर्षीय करोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत नाशिक शहरात एक महिला व पुरुषाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत १८ करोनाबाधित रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ६२२ करोनाबाधित आहेत.
आडगावजवळील कोणार्कनगरमध्ये शुक्रवारी डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असताना शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये कोणार्कनगरमध्ये एक पोलीस करोनाबाधित आढळून आला. रिपोर्ट येऊन अवघे तीन तास झाले असतानाच त्या पोलिसाचा मृत्यू झाला. नाशिक शहरात आत्तापर्यत दोन करोनाचे बळी गेले आहेत. पहिला बळी गर्भवती महिलेचा आहे. तर, दुसरा बळी पोलिसाचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही, नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावा, मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

नशिक करोना अपडेट

पॉझिटिव्ह रुग्ण ६२२
नशिक ४५ (मृत २)
मालेगाव ४९७ (मृत १८)
नाशिक ग्रामीण ६१
जिल्ह्याबाहेरील १९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -