घरताज्या घडामोडीमालेगावात नवीन पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 3 महिला, 2 पुरुष

मालेगावात नवीन पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 3 महिला, 2 पुरुष

Subscribe

कोरोना आजाराने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (11) रात्री जिल्हा रुग्णालयास 53 जणांचे रिपोर्ट मिळाले आहेत. त्यातील 31 नाशिक शहरातील असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. मात्र, उर्वरित 22 रिपोर्ट मालेगावचे असून 17 निगेटिव्ह व 5 पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत. आता मालेगावात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15 झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मालेगाव, चांदवड, लासलगाव व नाशिक शहरातील गोविंदनगर, आनंदवली, नाशिक रोड येथे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या ठिकाणी पोलिसांनी लॉकडाऊन केले आहे. आरोग्य विभागाने शनिवारी (दि.11) रुग्णांच्या संपर्कातील 36 नातलग व नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  कोरोनाबाधित देशातून नाशिक जिल्ह्यात आलेले व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक एक हजार 62 आहेत. त्यातील 625 जणांनी 14 दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यात 13 संशयित रुग्ण व 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयास शनिवारी रात्री 53 रिपोर्ट मिळाले आहेत. 31 रिपोर्ट नाशिक शहरातील असून ते निगेटिव्ह आहेत. मालेगावातील 22 पैकी 17 रिपोर्ट निगेटिव्ह व 5 पॉझिटिव्ह आहेत. त्यात 3 महिला व 2 पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक कारणास्तव घराबाहेर येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करावे व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन कोरोना जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -